Mahabaleshwar, Maharashtra, India
time : Jan 25, 2025 6:47 AM
duration : 1d 5h 13m
distance : 16.5 mi
total_ascent : 4472 ft
highest_point : 3306 ft
avg_speed : 1.5 mi/h
user_id : vijaylugade1989
user_firstname : Vijay Lugade
user_lastname : Lugade
Day 1 - वाडा कुंभोरशी - प्रतापगड फेरी - जुने रामवर्दयनी मंदिर - शेलार खिंड - कुडपण खु. ( शेलार वस्ती )
Day 2 - कुडपण खु. ( शेलार वस्ती ) - कुडपण बु.( बौद्ध वाडी ) - निगडा घाट - वडगाव
⚠️ Disclamer ⚠️
1. प्रतापगड वाडा कुंभोरशी ला जाण्यास ( बोरिवली नेन्सी कॉलनी ते महाबळेश्वर बस पकडली )
2. प्रतापगड फेरी
3. प्रतापगड महादरवाजातून जुने रामवर्दयनी मंदी राला जाण्यास वाट सरळ जंगलात गेली आहे वाट मळलेली आहे आम्ही जी वाट सुरवातीच्या टप्यात उतरलो ती गडाच्या भवानी देवी मंदिराच्या मागील बुरूजा खालून
गेलो त्यामुळे 1 तास वाट शोधण्यात वेळ गेला
4. मळलेली वाट लागल्यावर डोंगरधारेने वाट जुने रामवर्दयनी मंदिर वर घेऊन जाते
5.प्रतापगड महादरवाजा ते जुने रामवर्दयनी मंदिर कोकणात एकवाट उतरते ती चिपेचे दार
6 . रामवर्दयनी मंदिरच्या मागील बाजूस उजवीकडे पार घाट नावाचा जुना घाट आहे (प्रतापगड प्रदक्षिणा ही वाटे ने जाऊन गोमूख टाक्याआधी उजवीकडे वळावे तसेच गोमूख टाक्यापासून पुढे किनेश्वर गावात जात येते )
7. रामवर्दयनी मंदिर नंतर डोंगरधारेने जाताना वाटेत पांडवदारा ची वाट आहे ती उजवीकडे कोकणात उतरते थोडे आणखी पुढे गेल्यावर एक कातळ कडा दिसतो तो डावीकडून पार करून आपण परत डोंगर धारेने चालत असतो समोर दक्षिणेकडे बारखंडी वाटेची वाट किनेश्वर गावात तीन डोंगर धारेवरून उतरताना दिसते ( गूगल मॅपवर वाट स्पष्ट दिसते )थोडे पुढे गेल्यावर डावीकडे ही वाट गेलेली दिसते
8. बारखंडी वाट माथ्यावरून उजवीकडे कोंडोशी 4 उंबरठ्याचे गाव दिसते
9. इथून पुढे वाट डावीकडे ट्रॅव्हर्स मारत एका टार रस्त्यावर उतरते ह्या अगोदर आणि वाट चुकलो होतो
10. टार रस्त्याने कामटे गावाकडे जाताना उजवीकडे एक छोटी नाळ दिसते ती चढून डावीकडे ट्रॅव्हस मारत आपण शेलार खिंडी मध्ये प्रवेश करतो
11. कामटे गावातील लोक आम्ही जेथुन चढलो त्या नाळेतून ना येता टार रस्ता थोडे पुढे गेलो की एक वाट सरळ वर चढत खिंडी पोहचते
12. शेलार खिंडीत बांगडया आणि गवताची डहाळी ठेवलेली आढळतात
13. सदर शेलार खिंडीतून नैऋत्येस मसूरची डोंगर धार
उत्तरेस प्रतापगड, वायव्येस मंगळगड, मोहनगगड, तोरणा, ( राजगड आणी रायगड कदाचित ) दिसतात
14. शेलार खिंड ( जास्त चाल ) उतरून कुडपण खुर्द प्रवेश आणि मुक्काम
15. गावात पाणी उपलब्ध ( झऱ्याचे पाणी पाईपाने टाकीत आणले आहे )
16. कोंडाजी रायाजी शेलार समाधी, भराडीदेवी मंदिर, हनुमान मंदिर, सतीशिळा,
17. दुसरा दिवस 1) कुडपण खुर्द ( शेलार वस्ती), 2) कुडपण बुद्रुक ( चिकणे वस्ती ), 3) कुडपण बुद्रुक ( बौद्ध वाडी ) टार रस्त्याने चालणे
18. कुडपण बुद्रुक ( चिकणे वस्ती ) अगोदर कुडपण View Point ( डावी कडून उजवीकडे महारखिंड, चकदेव शिडी घाट rout, सुमारगड, महिपतगड दिसतो ) View Point उतरताना उजवीकडेकडे भीमाची काठी सुळका दिसतो
19. निगडा घाट उतरणे डावीकडे भीमाची काठी सुळका दिसतो तसेच धबधबा पात्र ओलाडावे लागते ( पिण्यायोग्य पाणी डबक्यात उपलब्ध) , नंतर जगबुडी नदी पात्रात प्रवेश
20. जगबुडी नदी पात्र ते वडगाव उजवीकडील जंगलातून मळलेली वाट पकडणे
21. हा ट्रेक आम्ही Jan मध्ये केला सहसा इतर ट्रेकर पावसाळ्यात करतात. पावसाळ्यात हा ट्रेकला धबधबे आणि नदी ओसोडून वाहते
22. पाणी उपलब्धता 1)प्रतापगड 2) रामवर्दयनी मंदिराजवळ पाण्याचे टाके, कुडपण खुर्द ( शेलार वस्ती), कुडपण बुद्रुक ( चिकणे वस्ती ),
कुडपण बुद्रुक ( बौद्ध वाडी ) 4) निगडा घाट अगोदर एक धबधबा पार करावा लागतो (पिण्यायोग्य पाणी डबक्यात उपलब्ध ) निगडा घाट उतरण्या अगोदर पाणी भरून घ्या नदीपात्रात पाणी आहे पण ते पिण्यासाठी योग्य आहे का ते सांगू शकत नाही
23. वडगाव ते खेड ST वेळापत्रका नुसार येत नाहीत त्या प्रमाणे खेडवरून मुंबई बुकिंग करावी