Tala Taluka, Maharashtra, India
time : Oct 5, 2025 6:26 AM
duration : 1h 30m 27s
distance : 1.4 mi
total_ascent : 393 ft
highest_point : 683 ft
avg_speed : 1.3 mi/h
user_id : varshukadam01
user_firstname : Varshu
user_lastname : Kadam
पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वतःकडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता.किल्ल्यात शिरतांना पडझड झालेला दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा. या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपऱ्यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. येथेच खडकात कोरलेले खांब टाके आहे. टाक्या जवळच प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प आपल्याला दिसुन येतात. दरवाजातून आत गेल्यावर गडमाथ्यावर प्रवेश करण्यापूर्वी बांधीव पायऱ्या व प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात.गडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात. किल्ल्यावरून घोसाळगड, मांदाड खाडी, कुडा लेण्यांचा डोंगर असा सर्व परिसर दिसतो.